स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By: Santosh Deshpande

Language: mr

Categories: Arts, Books

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Episodes

उद्याची 'फॉरेन लँग्वेज' कोणती?
Dec 15, 2025

परकीय भाषा शिकणे केव्हाही उपयुक्त असते, असे आपण ऐकतो. मात्र, आजच्या परिस्थितीत नेमक्या कोणत्या परकीय भाषा शिकायला हव्यात, कोणत्या भाषांना चांगले भवितव्य आहे याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. परकीय भाषातज्ज्ञ अदिती विशाल यांच्याशी याच विषयावर संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून परकीय भाषा का शिवावी इथपासून कोणती भाषा शिकणे सोपे आहे, कठीण आहे आणि कोणत्या भाषांना नजिकच्या काळात भवितव्य आहे इथपर्यंत अनेक बाबींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड होते. परकीय भाषांविषयी कुतुहल असलेल्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा स्टोरीटेल कट्टा स्पेशल पॉडकास्ट. 

हा एपिसोड युट्यूबवर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://youtu.be/wSEJ1-oXlx8

Duration: 00:25:02
`हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास` उलगडताना...
Nov 25, 2025

शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची ओळख. ही परंपरा काळाच्या ओघात समृद्ध होत गेली. गेल्या सात शतकांचा वेध घेत त्यातील महत्त्वाच्या नोंदी आपल्यापुढे आल्या आहेत 'हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास' या संशोधनसिद्ध ग्रंथातून. प्रसिद्ध गायिका, संगीताच्या अभ्यासक विदुषी अंजली मालकर यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनातून हा इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने पुढे आणला आहे. मराठी भाषेत कदाचित असा हा पहिलाच आणि एकमेव असा अनमोल दस्तऐवज ठरवा. अशा या प्रकल्पाविषयी, तो साकारताना गवसलेल्या आजवर अज्ञात अशा पैलूंविषयी जाणून घेऊया, दस्तुरखुद्द अंजली मालकर यांसमवेतच्या या संवादातून.

Duration: 00:49:20
....म्हणून `तुकाराम`! - दिग्पाल लांजेकर
Nov 15, 2025

आजचे आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा अभंग तुकाराम हा नवा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आपल्या शिवराज अष्टक मालिकेतील चित्रपटांच्या माध्यमातून मराठी रसिकांपुढे शिवकाळ उभा करणारे दिग्पाल लांजेकर यांना या नव्या निर्मितीतून काय संदेश द्यायचा आहे, संत तुकारामांचे, त्यांच्या अभंगांचे दर्शन नव्या पिढीपुढे त्यांना का उभा करावेसे वाटले, या प्रवासातील आव्हाने काय होती अशा अनेक प्रश्नांची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या संवादातून अशा अनेक बाबींची उलगड झाली, जी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलीच नव्हती. जरुर ऐकावा आणि सर्वांपर्यंत पोहोचवावा, असा हा स्टोरीटेल कट्ट्यावरील स्पेशल पॉडकास्ट...रसिकहो, तुमच्यासाठी. 

Duration: 00:43:52
`लक्षात ठेवण्या`ची कला!
Nov 05, 2025

स्मरणशक्ती ही आपल्याला लाभलेली देणच आहे. मात्र, आपण तिचा किती उपयोग करतो हे कोडेच असते. एखादी गोष्ट लक्षात ठेवणे ही खरे तर एक कलाच आहे. म्हणजे नेमके काय, याची उलगड करण्यासाठी मेमरी मॅनेजमेंट अर्थात, स्मरणशक्ती व्यवस्थापनात प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ विष्णू चौधरी सरांसोबत संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून उलगडल्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला या कलेच्या अगदी जवळ घेऊन जातात. मेमरी मॅनेजमेंट प्रत्येकाला सहज करता येतं आणि त्यातून त्यांच्या आयुष्याला नवी दिशाही मिळू शकते, याचा आत्मविश्वास जागवणारा हा खास पॉडकास्ट खास आपल्यासाठी. 

Duration: 00:43:39
ध्यानातून ज्ञानाकडे....
Oct 19, 2025

जगभरात दिवाळी साजरी होत असताना आपल्या अंतःकरणात तेज कसे जागवावे, जीवनात खरा प्रकाश कसा आणता येईल, याचं सुरेख विवेचन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये केले आहे. प्रत्येकाने जरुर ऐकावे आणि अंतरात साठवावे आणि समृद्ध व्हावे असे हे मौलिक विचारधन.

Duration: 00:28:46
स्टोरीटेलिंगचा फॉरमॅट बदलतोय?
Oct 06, 2025

गोष्ट ऐकणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य गोष्ट. गोष्ट सांगण्याचे, ऐकण्याचे माध्यम बदलत जात आहे. पारंपरिक पुस्तक, चित्रपटांपलीकडे जात ऑडिओबुक्स, शॉर्टफिल्म्स आता प्रचलित झाले आहेत. आता मोबाईलच्या माध्यमातून व्हर्टिकल स्टोरीटेलिंगचा ट्रेंडही जोरात सुरु आहे. या सर्व स्थित्यंतराचा वेध स्टोरीसाइड इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या पॉडकास्टमध्ये घेतला आहे.

Duration: 00:20:37
मृत्युनंतर घडतं काय?
Sep 19, 2025

मृत्युनंतर नेमकं काय घडतं, याचं अनेकांना कुतुहल असतं. मात्र, हा विषय फारसा चर्चिला जात नाही. याच विषयाची सविस्तर उलगड करण्यासाठी हा मेटाफिजिक्स अभ्यासक आणि अध्यात्मिक समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या लेखिका डॉ. मनिषा अन्वेकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला विशेष संवाद. व्यक्ती मरते म्हणजे काय घडते, माणसाला मृत्युची चाहूल लागते का, जन्म-मृत्यू आणि कर्माचा संबंध असतो का, मृत्यू हा विधिलिखत असतो का, आत्महत्या करणाऱ्यांच्या बाबतीत काय घडतं, आत्म्याशी खरंच संवाद होऊ शकतो का, श्राद्धकर्मे गरजेची असतात का या व अशा अनेक गूढ दडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा वेगळा पॉडकास्ट.
  
हा पॉडकास्ट युट्यूबवर पाहण्यासाठी - https://youtu.be/iPootIBEITs

Duration: 00:42:06
उद्योजकांचा सॅटर्डे क्लब!
Sep 10, 2025

मराठी लोकांमध्ये उद्यमशीलतेचा अभाव असल्याने ते उद्योग-व्यवसायात मागे पडतात, मुळात उद्योग करणे हा त्यांचा पिंडच नाही ही सामाजिक धारणा अजूनही आपल्याकडे आहे. ती मोडीत काढून व्यवसायात असणाऱ्या मराठीजनांना एका सूत्रात बांधत एकमेकांच्या साहाय्याने उद्योगात यश मिळवता येते, हे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने दाखवून दिले. कै. माधवराव भिडे यांच्या प्रयत्नांतून आणि प्रेरणेतून रुजलेले हे बीज आता चळवळ बनून अनेक मराठी उद्योजकांच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन आले आहे. `एकमेका साहाय्य करु, अवघे होऊ श्रीमंत` हे ब्रीद सार्थ करण्यासाठी आता `सॅटर्डे क्लब` महाराष्ट्रातच नव्हे तर देशात तसेच परदेशातही विस्तारते आहे. या पार्श्वभूमीवर, सॅटर्डे क्लबची सुरवात, आजवरचा प्रवास, त्यातील वैशिष्ट्ये आणि त्यातून उद्योजकांना मिळत असलेले फायदे याचा लेखाजोखा मांडण्यासाठी संतोष देशपांडे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस (सेक्रेटरी जनरल) सुहास फडणीस यांना बोलता केलं आणि उलगडत गेला एका उद्यमशील चळवळीचा प्रेरणादायी पट. प्रत्येक मराठीजनाने आवर्जून ऐकावा, जाणून घ्यावा असा हा विषय आणि त्यातील प्रेरक आशय.

Duration: 00:33:30
ढोल-ताशा आणि `आमचा` आवाज!
Sep 04, 2025

ढोलताशा पथक हे पुण्याच्याच नव्हे एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीतील एक अविभाज्य अंग आहे. विशेषतः गणेशोत्सवातील ढोलताशांचा निनाद हा सर्वांनाच भुरळ घालतो. अशा ढोलताशा पथकांमध्ये महिलावर्गाचाही फार मोठा सहभाग असतो. या महिलावर्गाचा विशेषतः पथकांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे जग काय असते, त्यांच्यापुढची आव्हाने काय असतात, त्यावर त्या कशी मात करतात, त्यांचे अनुभव काय आहेत...याबाबतचा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोच असे नाही. म्हणूनच, त्यांचे प्रतिनिधी म्हणून पुण्यातील अग्नि या ढोलताशा पथकाच्या मनिषा गोसावी आणि गायत्री शिरोडकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद ढोलताशांमधील महिलांचा हा आवाज उलगडून दाखवतो. 

हा एपिसोड यूट्यूबवर पाहायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा-  https://youtu.be/TbvFdxPkYzw

Duration: 00:30:15
`संस्कृत`ला भवितव्य आहे?
Aug 23, 2025

भारतातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतची आधुनिक काळात पिछेहाट झाली. मात्र, अजूनही तिचे अस्तित्व टिकून आहे. किंबहुना, तिला आता उर्जितावस्था येते आहे. बदलत्या काळात संस्कृतचे महत्त्व आणखी वाढणार आहे. ते कसे, याच विषयी `संस्कृत भारती`चे अ.भा. प्रचार प्रमुख डॉ. सचिन कठाळे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. या संवादातून संस्कृत का मागे पडली इथपासून ते संस्कृतमध्ये असे काय आहे, ज्यामुळे येत्या काळात तिचे महत्त्व वाढणार आहे इथपर्यंत अनेक गोष्टींची उलगड होते. संस्कृतकडे एक विषय म्हणून नव्हे तर एक भाषा म्हणून पाहिले गेले तर ज्ञान-रंजनाचे मोठे भांडार जगापुढे उलगडेल, याकडेही हा संवाद लक्ष वेधतो. 

Duration: 00:38:43
भाषा अनेक तर संधी अनेक!
Aug 14, 2025

बदलत्या जगात तुम्हाला जितक्या भाषा अवगत असतील तितक्या पुढे येण्याच्या संधीही लाभतील. म्हणूनच, `स्टोरीटेल कट्ट्या`वर संतोष देशपांडे यांनी संस्कृतपासून मराठी-कन्नड-मल्यालम अशा कैक भाषांमध्ये पारंगत असणारे विद्वान अभ्यासक, अनुवादक वासुदेव डोंगरे यांना बोलतं केलंय. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन मराठीवर प्रभुत्व मिळवून अन्य भारतीय भाषांवरही तितकेच प्रेम करणारे आणि त्यात आपले वेगळे करिअर घडवणारे भाषातज्ज्ञ वासुदेव डोंगरे यांचा आजवरचा प्रवास त्यांच्याकडून ऐकणे हा एक वेगळा अनुभव ठरतो. हा अनुभव केवळ भाषांवर प्रेम करण्याची प्रेरणाच देत नाही तर स्वतःला नव्याने शोधण्याची ऊर्मी जागवतो.
हा पॉडकास्ट युट्यूब वर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://youtu.be/g9Gw1U_aMaI

Duration: 00:55:30
एक अशीही `सृष्टी`
Jul 16, 2025

गोंदियासारख्या दुर्गम भागातून आलेली मराठी मुलगी सृष्टी पाटील पर्यावरणशास्त्राचे धडे घेऊन आता थेट अंतराळ जीवसृष्टीवर संशोधन करते आहे. तिचा आजवरचा प्रवास अत्यंत वेगळा आणि प्रेरणादायी आहे. आपली आवड जोपासत, मनातील कुतुहलभाव कायम राखत करिअर कसे घडविता येऊ शकते, याचे दर्शन तिच्या या प्रवासातून घडते. स्टोरीटेल कट्ट्यावर सृष्टीने तिच्या या प्रवासाचीच नव्हे तर एकूणच या क्षेत्राची, त्यातील विविध संधींची केलेली उलगड वेगळी दिशा देऊन जाते.  पर्यावरण अभ्यासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देऊन जाते. 

Duration: 00:29:40
महाराष्ट्रात हिंदी सक्तीची? खरे काय?
Jun 24, 2025

नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य देण्याकडे सरकारचा कल असल्याचे दिसताच त्यावर मोठा वादंग सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या भूमिकेवर मराठीप्रेमी नागरिकांकडून आक्षेप घेतला जात आहे. अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आणि शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी याच वादंगावर आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यात मराठीला डावलून हिंदीचा पुरस्कार होत असल्याच्या टिकेवर त्यांनी मांडलेली दुसरी बाजू ऐकायला हवी.

Duration: 00:20:53
पी.आर.चं बदलतं जग..
Jun 09, 2025

पब्लिक रिलेशन्स (पीआर) किंवा जनसंपर्क क्षेत्रात मागील काही वर्षांत अनेक स्थित्यंतरे आली आहेत. मूळात हे `पीआर` क्षेत्र कसे विकसित झाले, सध्या ते कुठे आहे, भविष्यात त्यातील संधी काय असणार या विषयी अनेकांना कुतुहल आहे. अनेक नामवंत संस्था व वलयांकित व्यक्तींसाठी `पीआर`चा चेहरा म्हणून प्रसिद्ध असणारे या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ तुषार जोशी यांच्याशी संतोष देशपांनी यांनी याच विषयावर संवाद साधला आणि त्यातून  अनेक विषयांची सहज उलगड होत गेली. चाकोरीबाहेरील काही जाणू इच्छिणाऱ्या, करु इच्छिणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा वेगळा पॉडकास्ट. 

Duration: 01:11:52
नाना पाटेकरांमधला `माणूस` समाजासाठी बोलतो तेव्हा...
May 30, 2025

निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी लोकसहभागातून सातारा जिल्ह्यातील आपल्या निढळ या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची उलगड करणारे सुनील चव्हाण यांनी लिहिलेले पुस्तक निढळ – ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न नुकतेच प्रकाशित झाले. प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नानांचे भाषण अत्यंत भावस्पर्शी, मनस्वी, दिशादर्शक होते आणि म्हणूनच ते संस्मरणीय देखील होते. कलाकार असलो तरी आपण समाजाकडे कसे पाहतो, लोकसहभागातून कार्य उभारले गेले तर त्याचे परिणाम काय होतात, अशा कामांमधून मिळणारे समाधान काय देऊन जाते यावर नाना पाटेकर दिलखुलास बोलले आहेत. म्हणूनच, प्रत्येकाने जरुर ऐकावे आणि मनात साठवावे असे हे नानाचे शब्द...श्रोतेहो खास तुमच्यासाठी. 

Duration: 00:27:27
अस्वस्थ जगात गुंतवणुकीच्या स्मार्ट संधी!
May 22, 2025

अस्वस्थ जगात गुंतवणुकीच्या स्मार्ट संधी

अर्थात, श्रीमंत बनण्याचे रहस्य! 

गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गाने न जाता असे कोणते मार्ग आहेत जे तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतील, सध्या जगभरात अस्वस्थता असताना गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काय करायला हवे, सोन्याचे भाव वाढतील की कमी होतील, गुंतवणुकीचे नेमके नियोजन का व कसे करायचे या व अशा प्रश्नांची उलगड गुंतवणूक सल्लागार संदीप भुशेट्टी यांनी केली आहे. त्यांचा स्वतःचा गुंतवणूकदार ते वेल्थ क्रिएटर हा प्रवास कसा झाला, याविषयी संतोष देशपांडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा अर्थपूर्ण संवाद प्रत्येकास नवी दिशा देऊन जातो.

Duration: 00:34:45
ऑपरेशन सिक्रेटस्, सरप्राइजेस् आणि सैनिकांचे मनोधैर्य
May 10, 2025

`ऑपरेशन सिंदूर`च्या निमित्ताने अनेक गोष्टींवर चर्चा, विश्लेषण होते आहे. त्याचवेळी अशा लष्करी ऑपरेशनच्या वेळी सिक्रसी (गुप्तता), सरप्राइजेस का आणि किती महत्त्वाचे असते, सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे मनोधैर्य कसे असते, कसे टिकते याविषयी ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद. 

Duration: 00:47:52
खडतर मार्ग...परखड भूमिका (शरद पोंक्षे)
May 03, 2025

शरद पोंक्षे म्हणजे एक अवलिया कलाकार. आपल्या कट्टर सावरकरभक्तीमुळे अनेक वादळे ओढवून घेत विचारांशी असणारी बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व. कलाजीवनात आणि समाजजीवनात अशा आव्हानांना भिडताना, त्यांना नेमके काय जाणवते, याची उलगड संतोष देशपांडे यांसमवेतच्या त्यांच्या या संवादातून होते.आवर्जून ऐकावा असा हा हटके पॉडकास्ट. 

Duration: 00:56:12
सावधान...Information Warfare चालू आहे!
Apr 30, 2025

इन्फर्मेशन वॉरफेअर म्हणजेच माहिती युद्धतंत्र हे माध्यमांच्या मदतीने केले जाणारे एक प्रकारचे युद्धच असते. त्यात शत्रू राष्ट्राकडून मीडिया युजर्स, चॅनल्स यांचा वापर केला जातो. कळत-नकळत अनेक जण त्यात ओढले जातात आणि त्याचा फायदा शत्रूला होतो. काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या प्रसंगानंतर भारत सरकारने प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमकर्त्यांना मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. या पार्श्वभूमीवर, संरक्षण माध्यमांचे अभ्यासक प्रा. विनय चाटी यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादात या `इन्फर्मेशन वॉरफेअर`ची उलगड केली आहे. आजच्या घडीला प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, समजून घ्यावा असा हा विषय.

Duration: 00:26:06
लाखमोलाचे सोने, पुढे काय?
Apr 28, 2025

सोन्याचा भाव लाखांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, असे नेमके कशामुळे घडले, भारतीयांना सोन्याचे इतके आकर्षण का आहे, सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरते का, भविष्यात याकडे कसे पाहायला हवे अशा अनेक बाबींचा उहापोह ज्येष्ठ संपादक, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी संतोष देशपांडे यांसोबतच्या या विशेष पॉडकास्टमध्ये केला आहे. सोन्याविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा वेगळा संवाद.

Duration: 00:30:08
चित्रपटांतून `इतिहास` शोधावा का?
Apr 19, 2025

चित्रपट असो वा साहित्यकृती त्याला इतिहासाची पार्श्वभूमी असेल तर त्यातून वाद निर्माण होतात. अलीकडच्या काळात रायगडावरील वाघ्यावरुन उफाळून आलेला वाद असो, छावा चित्रपटामुळे निर्माण झालेले वातावरण असो वा फुले चित्रपटाच्या ट्रेलवरवरुन सुरु झालेला वादंग असो....चित्रपट अथवा लेखनाकडे आपण इतिहास म्हणून खरंच पाहावा का, त्यातून समाजात जाणाऱ्या संदेशाकडे कसे पाहिले जातेय, त्यातून कलास्वातंत्र्याचा संकोच होतोय का, कलास्वातंत्र्य देखील सोयीचे असेल तरच त्याचा पुरस्कार होतो का या व अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर प्रसिद्ध साहित्यिक व संशोधक संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी केलेली ही रोखठोक चर्चा. 

Duration: 00:50:05
प्राण्यांशी संवाद साधताना...
Apr 12, 2025

प्रत्येक प्राण्याला मन असतं, ते व्यक्त करणारी त्यांची एक भाषाही असते. मात्र, मानवी जीवनात येणाऱ्या प्राण्यांच्या मनात काय चाललं आहे, ते काय बोलू पाहतात हे काही आपल्याला नेमकं लक्षात येत नाही. अशा वेळी टेलिपथिक अॅनिमल कम्युनिकेशन हे तंत्र उपयोगी येतं. त्यातील तज्ज्ञ असणाऱ्या प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे ही चक्क प्राण्यांशी संवाद साधते. हे नेमके कसे जमते, प्राणी तिच्याशी काय बोलतात, त्यांच्याशी बोलून तिला काय जाणवते या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा हा विशेष पॉडकास्ट. जागतिक पाळीव प्राणी दिनाच्या निमित्ताने, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा हा संवाद आपल्याला खूप काही शिकवून जातो.

Duration: 00:38:17
तेजोमय भारत`मित्रा`!
Mar 25, 2025

मित्रा देसाई... जगापुढे भारतीयत्वाची खरी ओळख पुढे आणण्यासाठी संशोधन, लेखन आणि संवादातून तेजोमय भारत सारखी संकल्पना पुढे आणणारी, शीतळा, फ्लॅग ऑफ अनंता यांसारख्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांची लेखिका आणि तेजोमय भारत सारख्या संकल्पनेतून भारताचा खरा इतिहास जगापुढे उलगडू पाहणारी ऑस्ट्रेलियात राहणारी मराठमोळी लेखिका. अत्यंत अभ्यासपूर्वक, सप्रमाण आपले मुद्दे मांडून त्याची उलगडून स्टोरीटेलिंग म्हणजेच गोष्टीरुपांत जगापुढे आणू पाहणारी ही विदुषि संतोष देशपांडे यांच्याशी जेव्हा संवाद साधते त्यातून कित्येक गोष्टींची सहज उलगड होत जाते... आपण प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, अनुभवावा आणि त्यातून बोध घ्यावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट. 

Duration: 00:50:40
दिल्लीतील सच्चाईशी `सामना`!
Mar 21, 2025

शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील पक्षाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सामना या दैनिकाचे दिल्लीतील ब्युरो चिफ नीलेशकुमार कुलकर्णी यांनी गेली अनेक वर्षांत दिल्लीतील राजकारण विशेषतः तेथील मराठीजनांचा प्रभाव अनुभवलेला आहे. पत्रकारितेच्या निमित्ताने अनेक राजकारण्यांशी जवळून संबंध आला आहे. त्यांची नोंद ठेवतानाच दिल्लीतील संसदेच्या आठवणींचा पट उलगडणारे पुस्तक त्यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे. `संसद भवन ते सेंट्रल व्हीस्टा` हे ते बहुचर्चित पुस्तक. त्यानिमित्ताने संतोष देशपांडे यांच्याशी संवाद साधताना नीलेशकुमार यांनी दिल्लीतील राजकारणाची सच्चाई मांडली आहे आणि तिच्याशी होत असणारा `सामना`ही उलगडून दाखवला आहे.  

Duration: 00:34:25
निवेदनातील `स्नेहल`वाट...
Mar 17, 2025

निवेदन हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडून अत्यंत मेहनतीतून त्यात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्याची किमया स्नेहल दामले यांनी साधली आहे. अभ्यासपूर्ण, आशयघन आणि संयत अशा निवेदनशैलीमुळे स्नेहलला रसिकप्रियता लाभली आहे. सांस्कृतिक, सांगीतिक आणि राजकीय अशा तिन्ही प्रकारांतील कार्यक्रमांना तिचे निवेदन, सूत्रसंचालन उंची देऊन जाते. पुण्यातील प्रतिष्ठीत वसंतोत्सव असो, अ.भा. मराठी साहित्य संमेलन असो, जागतिक मराठी परिषदेचे संमेलन असो वा अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा असोत स्नेहलने आपली कारकिर्द बहरत नेली आहे. तिच्यासमवेतच्या या गप्पांमधून तिचा प्रवास तर उलगडतोच शिवाय निवेदनकलेतील अनेक कौशल्यांचीही उलगड होते. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठीही या गप्पा मार्गदर्शक ठराव्यात. 

Duration: 00:54:44
पुस्तकं झपाटून टाकतात तेव्हा...
Mar 10, 2025

पुस्तक वाचनातून उत्तम वाचकच घडतो असं नव्हे तर त्यातून प्रेरणा घेत उत्तम लेखकही घडू शकतो. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित युवा लेखक, संपादक प्रणव सखदेव हे त्याचेच एक आदर्श उदाहरण. प्रणव सखदेवचा लेखनाकडे झालेला प्रवास, त्यातील अनुभव, त्याचे चौफेर वाचन आणि साहित्यनिर्मितीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन याची उलगड करणारा हा स्पेशल पॉडकास्ट. 

Duration: 00:36:15
पाकिस्तान abnormal का आहे?
Mar 07, 2025

पाकिस्तानची आजची अवस्था पाहता देश म्हणून तो सपशेल अपयशी असल्याचे पुढे येते. प्रत्येक आघाडीवर त्याची केवळ पिछेहाटच नव्हे तर तर दयनीय अवस्था झालेली आहे. हे असे का झाले, त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेथील लष्कर काय करते, राज्यकर्ते दिशाहीन का आहेत, तिथे मध्यमवर्ग का नाहीय या व अशा प्रश्नांची मालिका पुढे येते. त्याचीच संगतवार मांडणी करणारे `पाकिस्तान का मतलब क्या` हे पुस्तक नुकतेच दाखल झाले आहे. सध्या बेस्टसेलर म्हणून गाजत असलेल्या या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीधर लोणी यांच्याशी याच विषयावर रंगलेल्या या गप्पा.

Duration: 00:43:23
मिशन जेएनयू
Feb 08, 2025

देशातील सर्वात प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थांपैकी एक आणि सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्था म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यापीठातील आंदोलनांच्या अतिरेकामुळे ही सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली होती. तथापि, गेल्या अडीच-तीन वर्षांत चित्र बदलते आहे. विद्यापीठाच्या नेतृत्वात आणि पायाभूत सुविधांमध्ये नवीन बदल होत असल्याने परिस्थिती सुधारताना दिसते आहे.हे बदल काय आहेत? विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिष्ठा टिकवण्याच्या दृष्टीने हे बदल कसे सकारात्मक भूमिका बजावतील? जेएनयूच्या कुलगुरु डॉ. शांतीश्री पंडीत यांची याविषयी विशेष मुलाखत.

Duration: 00:35:25
दिल्लीत मराठी माणूस रमतो का?
Feb 03, 2025

देशाची राजधानी दिल्ली मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देते. मात्र, तरीही मराठीजनांना दिल्ली कायमच दूर वाटते. आगामी मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होते आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील टीव्ही माध्यमात कार्यरत असणारे युवा पत्रकार सोमेश कोलगे यांच्य़ाशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक वेगळ्या बाबींची उलगड झाली. मराठी माणूस दिल्लीत रमतो का, तेथील मराठी संस्कृती कशी आहे, अन्य घटकांना मराठीजनांविषयी काय वाटते अशा अनेक बाबींवर सोमेश कोलगे यांनी या सहजगप्पांमधून प्रकाश टाकला आहे. 

Duration: 00:20:44
स्टोरीटेलवरची एआय गोष्ट, डीपसीक आणि अमेरिका!
Jan 31, 2025

स्टोरीटेलवर नुकतीच संपूर्ण एआय निर्मिती असणारी गोष्ट दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हा प्रयोग नेमका काय आहे, चीनच्या डीपसीकने अमेरिकेची झोप का उडवली आहे आणि ट्रम्पतात्यांचे धोरण काय सांगते अशा साऱ्या गोष्टींची गप्पांमधून उलगड केली आहे, योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी. नवी आणि वेगळी माहिती देणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि संपन्न व्हा! 

Duration: 00:22:43
रहस्यकथांची, `वागळे की दुनिया`!
Jan 18, 2025

रहस्यकथा आवडणाऱ्या वाचकांना एक नवा लेखक लाभला आहे. त्याचं नाव सौरभ वागळे. स्वतः आयआयटीएन असलेल्या या युवा लेखकाने रहस्यकथा या साहित्यप्रकारात आपली अशी एक दुनिया उभी केली आहे. त्यास वाचकांचा विशेषतः तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभतो आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांनी सौरभला त्याची ही दुनिया उलगडून दाखवण्यासाठी बोलतं केलं आहे. नव्या पिढीतील हा आश्वासक लेखक नेमकं काय वाचतो, त्याच्या लेखनामागच्या प्रेरणा कोणत्या आहेत, ऑफीस आणि लेखन यांचा मेळ तो कसा साधतो, त्याच्या कथांमधील मुख्य पात्र असणाऱ्या `डिटेक्टिव्ह अल्फा` नंतर त्याच्या मनात काय आहे...हे सारं काही जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांपर्यंतही पोहोचवा.  

Duration: 00:32:11
११५ वर्षांपूर्वी...मराठी जाहिराती!
Jan 11, 2025

मनोरंजन हा मराठीतील पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रसिद्ध झाला. या अंकातील वैविध्यपूर्ण संपादकीय लेखनाबरोबरच यात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीही अत्यंत रंजक होत्या. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमध्ये. ११५ वर्षांपूर्वीच्या या जाहिरातींमधून त्या काळातील व्यवसाय, उद्योग ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींमध्ये कशी भाषा वापरली जायची, हे ऐकणे रंजक ठरेल. तेव्हा अनुभवू या एक प्रकारचा  `टाइम ट्रॅव्हल`!  

Duration: 00:38:21
२०२५ साठीचे सोप्पे संकल्प
Jan 04, 2025

नवे वर्ष लागल्यानंतर असे कोणते साधे-सोपे संकल्प आपण करु शकतो आणि ते पूर्ण करु शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात नवे पर्व येईल..त्याविषयी वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी. 

Duration: 00:13:32
पाकिस्तान बनलयं भिकारीस्तान!
Dec 28, 2024

जगात दहशतवाद पसरवण्याबद्दल आधीच प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानची ओळख आता भिकाऱ्यांचा निर्यातदार अशीही बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यातील संबंधही बिघडण्याच्या मार्गावर आहेत. खुद्द पाकिस्तानात भिक मागणे हा एक मोठा व्यवसाय होऊन बसला आहे. हे सारं नेमकं काय चाललं आहे, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा. 

Duration: 00:14:11
समलैंगिक ओळख उघड झाली तेव्हा...
Dec 24, 2024

अशोक रावकवी.... देशातील एलजीबीटीक्यू समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मोठे नाव. पुण्यात झालेल्या मूकनायक २०२४ या एलजीबीटीक्यू समूहाच्या साहित्य संमेलनात त्यांनी एका सत्रात आपले अनुभव सांगितले. या प्रसंगी, त्यांनी आपली समलैंगिक ओळख उघड झाली तो क्षण पुस्तकातून ज्या लेखातून मांडला, त्याचेही प्रकट वाचन झाले. खरे तर हे मोठे धाडसच म्हणायचे. मात्र, त्यांनी ते दाखवले. तेव्हाचे हे रेकॉर्डिंग. 

Duration: 00:27:33
आता जगात `गर्जे मराठी`!
Dec 16, 2024

जगभरातील मराठीजनांमध्ये आत्मविश्वास जागवत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत उभं करण्यासाठी गर्जे मराठी ही संस्था उदयास आली. आता ही संस्था एक चळवळ बनली आहे. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी गर्जे मराठीचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांसमवेतच्या या संवादातून. प्रत्येक मराठीजनास अभिमान वाटावा, अशा या विचारांना ऐकणं म्हणजे मनात नव्या प्रेरणा जागवणं... 

Duration: 00:44:39
पुस्तक वाचन टाळण्याच्या ५ सबबी!
Dec 07, 2024

अशी कोणती कारणं आहेत, जी आपणास पुस्तकांपासून किंवा वाचनापासून दूर ठेवतात... खरं तर ही कारणं नव्हेत तर चक्क सबबी आहेत. या सबबी कोणत्या आणि त्यामुळे आपण काय गमावत आहोत, याचा वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी, तुमच्यासमवतेच्या संवादातून. 

Duration: 00:14:45
दिल्लीचे तख्त...फोडले की राखले?
Nov 30, 2024

दिल्ली आणि महाराष्ट्रातील संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त फोडले असे म्हणतात...तर महाराष्ट्रगीतात महाराष्ट्र हे दिल्लीचेही तख्त राखतो असे म्हणतात. या अनुषंगाने इतिहासाचे संशोधक व प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक संबंधांचा वेध संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून घेतला आहे. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट. 

Duration: 00:42:01
`स्टोरीटेल`ची ७ वर्षे!
Nov 25, 2024

जगातील एक आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणारे स्टोरीटेल भारतात येऊन ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद. 

Duration: 00:18:01
ट्रम्पतात्या जिंकले..`अमेरिकन भाऊ`चं काय म्हणणंय?
Nov 16, 2024

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि योगेश दशरथ यांनी. मित्रांमधल्या सहज गप्पांमधून अमेरिकेच्या भविष्याविषयी होणारं हे भाष्य फार गंभीरपणे घेऊ नये..मात्र त्याची नोंद जरुर ठेवावी अशा अनेक गोष्टी इथे उलगडतील. 

Duration: 00:25:34
गाण्यातली `मेलडी` अन् त्याचे `मेकर्स` !
Nov 09, 2024

कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग विभागाची धुरा वाहणारे प्रसिद्ध साउंड इंजिनिअर तुषार पंडीत यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून गायक आणि रेकॉर्डर यांच्यातील एक आगळं नातं पुढं आलं. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे हे दोन्ही दिग्गज त्यांच्या आजवरच्या प्रवासाकडे कसे पाहतात, त्यांचं आगळं जग त्यांनी कसं उभं केलं, त्यातील टर्निंग पॉइंटस् कोणते आणि या क्षेत्रात पुढं येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी काय तयारी करायला हवी अशा अनेक बाबींची छानशी उलगड या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये होते. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा. 

Duration: 00:40:32
दिवाळीनंतरचे `राजकीय फटाके`
Nov 01, 2024

महाराष्ट्रातील यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व अशी आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये सत्तेत येण्यासाठी तुंबळ लढाई सुरु झालेली आहे. दुसरीकडे सामान्य मतदारही कमालीचा अस्थिर झाल्याचे चित्र आहे. या साऱ्या चित्राकडे पाहता सध्याचे राजकारण कोठे जाते आहे, कोणाचे काय चुकते आहे, कोणत्या पक्षाची काय बलस्थाने आणि उणीवा आहेत आणि मतदारांनी नेमके काय करायला हवे याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सल्लागार राजेंद्र हुंजे यांनी आपली परखड मते मांडली आहेत, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्पेशल पॉडकास्ट मध्ये. जरुर ऐका, आणि हे राजकीय फटाके कोणते असतील, हे जाणून घ्या. 

Duration: 00:32:05
दिवाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जावे कुठे?
Oct 26, 2024

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठं फिरायला जावं असा एक प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच, या प्रश्नाची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, पर्यटन सल्लागार व स्मिता हॉलिडेज् या नामांकित संस्थेच्या संचालक प्रज्ञा गोरे यांना. सध्या कोणती पर्यटनस्थळे ट्रेंडिंग आहेत, या सिझनमध्ये कुठे कुठे जाता येऊ शकते इथपासून ते सर्वांपेक्षा वेगळी अशी ऑफबिट डेस्टिनेशन्स कोणती आहेत, याची छानशी उकल प्रज्ञाने यामध्ये केलेली आहे. फिरायला जावेसे वाटणाऱ्यांनी आवर्जून ऐकावा, असा हा पॉडकास्ट. 

Duration: 00:20:01
रहस्यकथांची `मास्टर की`!
Oct 19, 2024

दिवाळी जवळ आली की आपल्याकडे दिवाळी अंकांचे आगमन सुरु होते. यंदा `मास्टर की` नावाचा दिवाळी अंक प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहे. हा रहस्यकथा विशेषांक आहे. त्याचे स्वागत करतानाच, एकूणच दिवाळी अंकांचं रहस्यकथांशी असणारं नातं, या दिवाळी अंकातील रहस्यकथांचे वेगळेपण तसेच त्यातील संपादनाचा अनुभव या विषयावर संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे `मास्टर की` ची संपादकीय धुरा ज्यांनी सांभाळली ते संपादक सम्राट शिरवळ यांना. दिवाळी अंकांच्या दुनियेतील हा वेगळा प्रयोग रसिकांपुढे येताना त्यानिमित्त रंगलेला हा पॉडकास्ट ऐकणं हा देखील एक आगळा अनुभव ठरावा. 

Duration: 00:23:25
कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे भविष्य काय?
Oct 03, 2024

जगभरात मोठे अस्थिर वातावरण आहे. इस्त्रायल -इराण यांच्यातील थेट युद्ध ते अमेरिका, चीन, रशिया यांच्यातील सुप्त संघर्ष आणि त्यातून वेगाने पाहणारे जागतिक चित्र, यांचा आढावा घेतानाच असा स्थितीत, भारतात आयटी किंवा संगणक क्षेत्रात अभियंते होऊन उत्तम करिअर करु पाहणाऱ्यांपुढे काय आव्हाने असणार आहेत, याचा नेमका वेध स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून घेतला गेला आहे. आयटी क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या प्रत्येकाने अन् त्याच्या पालकांनी ऐकालयाच हवा असा हा पॉडकास्ट. 

Duration: 00:25:42
ढोल-ताशांचा `नाद`!
Oct 02, 2024

गणेशोत्सव सोहळ्यात खरे रंग भरतात ते ढोल ताशा पथकांकडून केले जाणारे जल्लोषमय वादन. पुण्यातून सुरु झालेली ही ढोल-ताशा संस्कृती आता जगभरात विस्तारली आहे. मात्र, ढोलताशा पथकांत काम करणाऱ्यांचे जग नक्की काय असते, ते कोणत्या भावनेतून वादन करतात, त्यातून त्यांना काय मिळते, ढोलताशांचे अर्थकारण काय असते, अशा पथकांपुढची आव्हाने काय असतात या व अशा अनेक प्रश्नांची उलगड पुण्यातील अग्नी या ढोलताशा पथकाचे प्रमुख मंदार गोसावी यांनी संतोष देशपांडे यांच्याशी बोलताना केली आहे. हा पॉडकास्ट एकूणच ढोलाताशांविषयी आपल्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची सहज उलगड करतो आणि त्यांच्यापुढच्या प्रश्नांनाही वाचा फोडतो.  

Duration: 00:36:23
गणेशोत्सव@ स्टॉकहोम
Sep 07, 2024

स्वीडन...युरोपातील उत्तरेकडील एक प्रगत आणि सुंदर राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या या देशात तेथील महाराष्ट्रीय किंवा मराठी समाजाने आपली सांस्कृतिक ओळख, परंपरा जतन करण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथील महाराष्ट्र मंडळ हे तेथील तमाम मराठीजनांचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेच्या माध्यमातून स्टॉकहोमला मराठी भाषा, संस्कृती, परंपरा जपण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम चालविले जातात. गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी एक मोठा उत्सव असतो. गणरायांच्या आगमनाच्या निमित्ताने, स्टॉकहोम येथील मराठीजन एकत्र येऊन गणेशोत्सव कसा साजरा करीत आहेत, भाषा, संस्कृतीचे जतन करण्यासाठी ते कशा पद्धतीने कार्यरत आहेत, महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम सर्वांना एका धाग्यात बांधत हे कार्य कसे पुढे नेते आहे यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केले आहे, महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमचे प्रतिनिधी मृणाल पवार आणि अविनाश डोंगरे यांना. त्यांच्या समवेतच्या गप्पांमधून साता समुद्रापारची ही मराठी मंडळी आपल्या संस्कृती व परंपरेचे जतन करण्यासाठी किती धडपड करत असते आणि त्यांच्या मनात काय भावना असतात, याची छानशी उलगड होते. 

Duration: 00:34:17
आरक्षणात वर्गवारी का हवी?
Aug 31, 2024

घटनेने दिलेल्या आरक्षणात वर्गवारी व्हायला हवी का, असा एक महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चव्हाट्यावर आला आहे. घटनेने दिलेल्या आरक्षणात क्रिमिलेअरसारखे निकष लावून वंचितांतील वंचितांना पुढे यायची संधी मिळावी, असे अनेकांना वाटते, तर मूळात अशा प्रकारे भेद करता येणार नाही, असे दुसऱ्या बाजूचे म्हणणे आहे. या संवेदनशील विषयावर, ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व जातीव्यवस्थेचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी आरक्षणात वर्गवारी असायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. देशाच्या दृष्टीने आरक्षणातील वर्गवारी हा विषय किती महत्त्वाचा आहे, त्याचे काय दूरगामी परिणाम होऊ शकतात याची उलगड करणारा हा परखड पॉडकास्ट. 

Duration: 00:19:22
भविष्यात नोकऱ्यांचं काय होणार?
Aug 25, 2024

आगामी काळात जगभरात नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे भाकित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नोकरी ही संकल्पना कशी बदलते आहे, का बदलते आहे तसेच वेगळ्या भाषा शिकल्याने करिअरचा आलेख उंचावता येणे कसे शक्य आहे, याविषय विश्लेषण केले आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि भविष्याचा कानोसा आताच घ्या. 

Duration: 00:16:18
उद्यमी `नेक्स्टजेन`ची `मूव्हिंग ॲस्पिरेशन्स`!
Aug 17, 2024

उद्यमी तरुणाई हे भारताचे भूषण. ज्या तरुण उद्योजकांनी आपल्या पूर्वीच्या पिढीपासून आलेला उद्योगाचा वारसा पुढे नेताना आपला स्वतःचा ठसा उमटविला आणि आपल्या उद्योगाला नवी दिशा दिली, अशा नेक्स्टजेन उद्योजकांच्या यशाची गाथा म्हणजेच मूव्हिंग ॲस्पिरेशन्स. प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून आपल्यापुढे आलेली ही नवकर्तृत्वाची शोधयात्रा दोन भागांमधून मुद्रित तसेच पॉडकास्ट माध्यमातून श्राव्यरुपात वाचक-श्रोत्यांपुढे आली आहे. यानिमित्ताने, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून या अभिनव प्रयोगाची सहज उलगड तर होतेच आणि त्यातून दत्ता जोशी यांना आपल्या उद्ममशील लेखनप्रवासातून गवसलेली उद्यमशीलतेची स्पंदनेही आपणास ऐकू येतात. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा कट्टा स्पेशल पॉडकास्ट जरुर ऐका...

Duration: 00:37:07
दिल्लीत मराठीचा जागर व्हायलाच हवा!
Aug 10, 2024

आगामी अ.भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्याचे निश्चित झाले. मात्र, त्यावर महाराष्ट्रातील अनेकांनी, विशेषतः ग्रंथविक्रेत्यांनी नापसंती व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, दिल्लीमध्ये मराठी साहित्य आयोजित करणे का ऐतिहासिक आहे, त्यातून नेमके काय साध्य होणार आहे याविषयी परखड भाष्य केले आहे ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संजय सोनवणी यांनी. संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये सोनवणी यांनी मराठी लोकांच्या दिल्लीकडे पाहण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केले आहे.  

Duration: 00:28:27
तुम बिन जाऊँ कहाँ...किशोरदा!
Aug 03, 2024

किशोरकुमार असं नुसतं म्हटलं तरी त्याची असंख्य गाणी मनात गुंजू लागतात. मन प्रसन्न करुन जातात. कैक पिढ्यांचं भावजीवन त्यांच्या जादुई आवाजावर पोसलं गेलं आहे. अशा या किशोरदांना गुरुस्थानी मानून गेली २५ वर्षे अविरत गायन करणारे आणि `व्हाइस ऑफ किशोरकुमार` अशी कीर्ती लाभलेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचे `किशोरमय` विश्व देखील अद्भूत आहे. हे विश्व जाणून घेण्यासाठी, त्यांच्या नजरेतील किशोरदा जाणून घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी त्यांना बोलतं केलं आणि स्टोरीटेल कट्ट्यावर रंगली किशोरदांवरची मैफल...या हुरहुन्नरी, अजरामर कलाकाराच्या जन्मदिनाच्या (४ ऑगस्ट) पूर्वसंध्येला, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी..तुमच्या-आमच्या मनातील किशोरदांच्या गाण्यांना पुन्हा ओठावर आणण्यासाठी! कट्ट्यावरची ही स्पेशल मैफल, किशोरदांना अर्पण! 

Duration: 00:35:12
ट्रम्पवरील हल्ला आणि अमेरिकेतील गन-कल्चर!
Jul 20, 2024

सध्या जगभरात अनेक पातळ्यांवर उलाथापालथ सुरु आहे. क्रीडा क्षेत्रात टी२० वर्ल्डकप, विम्बल्डन, युरो, कोपा अमेरिका अशा स्पर्धांनी मागचा आठवडा गाजवला. तोवर मुद्दा पेटला तो अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा. त्यानिमित्ताने, अमेरिकेत हे गन-कल्चर कसे आहे, त्याची मूळं कुठे आहेत याचा वेध घेतला स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश देशपांडे आणि संतोष देशपांडे यांनी या पॉडकास्टमधून. ग्लोबल विषयांचा हा धावता आढावा घेताना इथे योगेशने दिल्या आहेत स्टोरीटेलवरील काही इंटरेस्टिंग बुक टीप्स! जरुर ऐका..

Duration: 00:25:45
वारी... `इव्हेंट` नव्हे तर थोर आणि उदार परंपरा!
Jul 06, 2024

पंढरपूरला विठुरायाच्या ओढीने अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी धाव घेतात. या वारीमध्ये असं नेमकं काय असतं, जे त्यांना एका सूत्रात बांधतं? अलीकडच्या काळात वारीला इव्हेंट म्हणून पाहणारा वर्ग उदयास येताना दिसतो. त्याचवेळी राज्यातील सामाजिक वातावरणही जाती-जातींमधील अविश्वासातून बिघडू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर, वारी म्हणजे नेमके काय, ती काय साध्य करते, काय संदेश देते यावर संत साहित्याचे अभ्यासक, पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी परखड भाष्य केले आहे. संतोष देशपांडे यांसमवेत त्यांनी साधलेल्या या संवादातून वारीचे नेमके आकलन तर होतेच शिवाय महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेतून महाराष्ट्र धर्माचे दर्शन होते. प्रत्येकाने मन लावून ऐकावा आणि हृदयात साठवावा, असा हा संवाद `या हृदयीचा त्या हृदयी` पोहोचावा. 

Duration: 00:41:45
`आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग` उलगडताना...
Jun 30, 2024

आर्थिक गुन्हेगारी उघडकीस आणणारे फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नेमके काय, त्यात काय केले जाते, देशातील अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आणण्यात या तज्ज्ञांचे योगदान किती मोठे आहे या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी नवीन आहेत. पुण्यातील फॉरेन्सिक ऑडिटर अपूर्वा जोशी यांनी याच विषयावर लिहिलेले आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. ते सध्या अत्यंत गाजते आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द लेखिका अपूर्वा जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक अज्ञात पैलू उलगडत गेले. जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवावा असा हा कट्टा स्पेशल पॉडकास्ट. 

Duration: 00:43:29
केल्याने युरोप पर्यटन...
Jun 16, 2024

पर्यटन हे फक्त मनास विरंगुळा म्हणून असतं का? नाही! 
पर्यटनातून त्याहून वेगळं काही साध्य होत असतं. त्यातून आपला दृष्टिकोन विकसित होतो. 
युरोपमध्ये काही दिवसांपूर्वी भ्रमंती केल्यानंतर ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि संतोष देशपांडे यांना काही वेगळं गवसलं... त्याची, त्यांच्याच गप्पांमधून उलगड करणारा हा अत्यंत वेगळा पॉडकास्ट. प्रत्येकानं जरुर ऐकावा अन् वेगळ्या दुनियेतील डोळस मुशाफिरी करावी. 

Duration: 00:27:49
`डायरेक्टर्स`चा पट उलगडताना...
Jun 11, 2024

आपल्या अजरामर कलाकृतींमधून कैक दशके कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणजेच `डायरेक्टर्स` आता नव्याने आपल्या भेटीस आले आहेत. होय, प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या `डायरेक्टर्स` या पुस्तकातून निवडक भारतीय दिग्दशर्कांच्या कलाप्रवासाचा ओघवता आस्वाद रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या ग्रंथनिर्मितीमागची पटकथा काय होती, हे दीपा देशमुख यांसमवेतच्या या संवादातून संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमधून आपणापुढे आणली आहे. कोणत्या दिग्दर्शकाची कोणती वैशिष्ट्ये आहेत, त्यांच्यातील वेगळेपण कशात आहे आणि हे सारं पुस्तकातून आस्वादित करताना काय अनुभव आले, याची सुरेल उलगड दीपा देशमुख यांनी केली आहे. आपल्या मनातील रसिकतेचा पत्ता शोधू पाहणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.  

Duration: 00:30:56
'फिल्ममेकिंग' मध्ये करियर करायचंय?
Jun 03, 2024

मनोरंजन क्षेत्र विशेषत: चित्रपट निर्मिती अर्थात 'फिल्ममेकिंग' अनेकांना करिअर साठी साद घालते. प्रत्यक्षात हे क्षेत्र कसे आहे,  त्यात करियर कसे होते? त्यासाठी शिक्षणाच्या संधी कोणत्या आहेत,  या विषयावर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक,  लेखक व माध्यमकर्मी प्रसाद नामजोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद तुम्हाला नेमकी दिशा देऊन जातो!

Duration: 00:36:02
शालेय ग्रंथालयांची साद...
May 26, 2024

मुलांचे पुस्तकांशी नाते जडले तर त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते, मनात प्रेरणा पेरल्या जातात. याकामी शालेय ग्रंथालये मोठी भूमिका बजावू शकतात. प्रत्यक्षात, आज शाळेतील ग्रंथालयांची स्थिती कशी आहे, यावर संशोधन करुन पीएचडी मिळविलेल्या सीमा तारे यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याचाच वेध घेणारा कट्ट्यावर रंगलेला हा संवाद प्रत्येक शिक्षक, पालक आणि पुस्तकप्रेमी घटकाने ऐकायलाच हवा!

Duration: 00:24:30
सृजनाच्या वाटेवर.... मिलिंद जोशी (२)
May 18, 2024

निर्मितीची प्रक्रिया ही एका अर्थाने अतिशय सहज, सोपी असते तर दुसऱ्या अर्थाने अत्यंत कठीण. विशेषतः कलाक्षेत्रात.. जिथे तुमच्या भावभावनाही तुमच्या प्रतिभेच्या कर्तृत्वाच्या साक्षी असतात.... मिलिंद जोशी यांनी अशा कलाक्षेत्रात आपल्यातील सृजनशीलतेला एका आशयघन जगण्याचे जणू एक माध्यमच बनवले... नेमके कसे... ऐका त्यांच्यांच शब्दांत. शब्द, सूर, स्वर आणि भावनांच्या एकात्मेचे क्षितिज शोधू पाहणाऱ्या या कलाकाराच्या ` सृजनाच्या वाटेवर`च्या गप्पांचा हा उत्तरार्ध. केवळ ऐकू नका तर मनातही साठवा. कदाचित, तुमचीच तुमच्याशी नव्यानं ओळख होईल. 

Duration: 00:27:49
सृजनाच्या वाटेवर....मिलिंद जोशी (१)
May 11, 2024

सर्जनशीलतेची अनिवार ओढ मनात असेल तर आपला `आरसा` होतो म्हणजे नेमकं काय घडतं?
शब्द, स्वर, संगीत आणि अमूर्त चित्रांच्या आगळ्या विश्वात रममाण होत आगळं जगणं जगणारे प्रतिभावंत कलाकार मिलिंद जोशी यांनी आपल्या सृजनरंगात रंगण्याचा प्रवास खास कट्ट्याच्या श्रोत्यांपुढे उलगडून दाखविला आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या संवेदनशील कलाकाराची, त्याच्या भावविश्वाची हळूवार उलगड मिलिंद जोशी यांच्या समवेत संतोष देशपांडे यांनी मारलेल्या या गप्पांमधून होतो. अशा या सृजनाच्या वाटेवरच्या गप्पांचा हा पूर्वार्ध तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, हे नक्की. 

Duration: 00:41:00
करिअरची निवड करताना...
May 04, 2024

दहावी-बारावीनंतर आता खरे वेध लागले आहेत ते पुढच्या करिअरसाठी अभ्यासक्रम निवडण्याचे. खरं तर करिअर मार्गदर्शन हे वेळेवर आणि अचूक होणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच खास कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक प्रा. केदार टाकळकर यांना. करिअरची निवड कशी करावी हे सांगतानाच टाकळकर सरांनी अनेक गोष्टींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड करुन दिली आहे, छानशा टिप्सही दिल्या आहेत. करिअरविषयी विचारात असणाऱ्या प्रत्येकाने जरुर ऐकावा असा हा विशेष पॉडकास्ट. 

Duration: 00:38:39
डॅम इट आणि महेश कोठारे
Apr 27, 2024

प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते महेश कोठारे हे मराठी सिनेजगतातील सुपरस्टार. त्यांनी लिहिलेले `डॅम इट आणि बरंच काही...` हे आत्मचरित्र त्यांच्याच आवाजात आता `स्टोरीटेल`वर आले आहे. त्यानिमित्त पुण्यात त्यांचा विशेष गौरव झाला. त्या प्रसंगी  खुद्द महेश कोठारे, ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, सिनेपत्रकार व तारांगणचे संपादक मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. त्यात कोठारे यांनी या आत्मचरित्रामागची पार्श्वभूमी उलगडून दाखविली, फुटाणे यांनी कोठारे यांच्या चित्रपटसेवेतील महत्त्व अधोरेखित केले, तर मंदार जोशी यांनी या पुस्तकाच्या निर्मितीवेळच्या आठवणींना उजाळा दिला. 

स्टोरीटेल वर `डॅम इट आणि बरंच काही` ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/damn-it-ani-barech-kahi-2819989

Duration: 00:15:16
प्रा. भास्कर चंदनशिव सरांचं साहित्यचिंतन!
Apr 20, 2024

आपल्या कसदार लेखणीतून ग्रामीण मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देणारा लेखक अशी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची साहित्यजगतात ओळख आहेच. हा व्रतस्थ लेखक आपल्या कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी बोलता झाला आहे. प्रा. चंदनशिव सरांनी संतोष देशपांडे यांसमवेत संवाद साधताना मराठी साहित्यातील विविध प्रवाह, त्यांचा प्रवास, त्यातील विविध टप्पे यांची उलगड करुन दाखवली आहे. ज्यास आपण समकालीन साहित्य म्हणतो, ते नेमके काय आहे, चिरंतन टिकणारं साहित्य कोणतं इथपासून ते काय वाचावं इथपर्यंत त्यांनी आपल्या चिंतनात सुरेख भाष्य केलं आहे. तमाम मराठी साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरेल, असा हा पॉडकास्ट प्रत्येकाने आवर्जून ऐकायलाच हवा आणि इतरांपर्यंत पोहोचवायलाच हवा...कारण हा आहे एक आगळा आणि अनमोल असा साहित्यिक दस्तऐवज.

Duration: 00:52:40
`एआय`च्या युगात करिअरच्या दिशा कुठल्या?
Apr 13, 2024

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान वेगाने सर्वत्र विस्तारत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात चांगले करिअर घडण्यासाठी काय शिकायला हवे, कोणता दृष्टिकोन विकसित करावा लागेल, याची माहिती सर्वांना असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयी मार्गदर्शन केले आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या संवादातून. प्रत्येक सजग पालकाने आणि करिअरविषयी गंभीर असणाऱ्या विद्यार्थ्याने ऐकायलाच हवा, असा हा पॉडकास्ट. 

Duration: 00:19:35
संवाद...एका `संवादमित्रा`शी!
Apr 06, 2024

सुनील महाजन म्हणजे आपल्या सांस्कृतिक चळवळीस वाहून घेतलेले एक अवलिया व्यक्तिमत्व. आपल्या `संवाद, पुणे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर बालनाट्य चळवळ, नाटक, चित्रपट, साहित्य अशा विविध प्रांतांत विलक्षण उत्साहाने अनेक संकल्पना रुजविल्या, त्यातील व्यक्तिमत्वं घडविली, माणसं जोडली आणि त्यांच्या सुखदुःखाच्या क्षणी खंबीरपणे पाठीशीही उभे राहिले. नुकतेच त्यांनी वयाची ६१ वर्षे पूर्ण केली आणि त्यानिमित्त त्यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं तेव्हा उलगडला तो त्यांचा थक्क करणारा प्रवास. सांस्कृतिक चळवळीतील सच्चा कार्यकर्ता असं बिरुद अभिमानाने मिरवू पाहणाऱ्या सुनील महाजनांचा हा प्रवास, त्यांना आलेले अनुभव ऐकणं, हा देखील एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो. 

Duration: 00:44:05
`भविष्य नावाचा इतिहास` लिहिताना...
Apr 02, 2024

आजच्या बदलांचा वेग लक्षात घेता भविष्यातील मानवजीवन, त्याची व्यवस्था, तेव्हाचे जगाचे मानसिक वास्तव याचा भेदक वेध घेणारी विलक्षण कादंबरी प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिली आहे. ती नुकतीच प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने आजचे भविष्य अन् उद्याचा इतिहास यांच्या दरम्यान उलगड जाणाऱ्या अनेक पैलूंचा वेध एका विलक्षण कथानकातून कसा घेता आला, याची उलगड संजय सोनवणी यांनी संतोष देशपांडे यांच्यासमवेत रंगलेल्या या गप्पांमधून केली आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उद्योगक्षेत्रात काळाच्या पुढचा विचार करीत सोनवणी यांनी स्वतः ज्यावर  मोठे काम केले होते अशा `हेलिकार` तसेच `कॉन्टम फिजिक्स`सारख्या संकल्पनांची उकलही या संवादातून प्रथमच श्रोत्यांपुढे होते. प्रत्येकाचे आवर्जून ऐकावा असा हा संवाद नवी दृष्टी देऊन जातो. 

Duration: 00:26:41
राजकवी तांबेंच्या `भारा`वलेल्या आठवणी...
Mar 30, 2024

मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात, असे राजकवी भा.रा. तांबे यांच्या कवितांचे गारुड तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ रसिकांवर टिकून आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, नववधु प्रिया मी बावरते, मधु मागसि माझ्या सख्या परि, कशी काळनागिनी, घन तमी शुक्र बघ राज्य करी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या अशा त्यांच्या कित्येक रचना आपल्या अंतरीचा तळ ढवळतात. अशा या राजकवींचे नातू शिरीष तांबे यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या संवादातून त्यांनी तो काळ आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि ऐकता ऐकता आपणही `भारा`वून जातो...स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा. 

Duration: 00:48:49
`शहिदांच्या पत्रां`ची गोष्ट...
Mar 23, 2024

देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे म्हणजे भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. 93 वर्षांपूर्वी या तिघांना फाशीवर चढविण्यात आले. मात्र, आपल्या बलिदानातून त्यांनी तरुणाईला देशासाठी निधड्या छातीने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतन राखण्यासाठी आजही २३ मार्च शहिद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांचा एकमेकांमधील पत्रव्यवहार जेव्हा पुढे आला, तेव्हा त्यांच्या मनातील अंतरंगाची, त्यात दडल्या भावनांची हळवी आणि तितकीच ठाम अशी उलगड होते. ती समाजापुढे आणण्यासाठी हरहुन्नरी असे ज्येष्ठ कलाकार सुधीर मोघे यांनी मोठ्या प्रयत्नांतून `शहिदांची पत्रे` नावाने अत्यंत हृद्य असे सादरीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचीच उलगड करण्याचा प्रयत्न केला आहे संतोष देशपांडे यांनी. देशप्रेमाचा ओलावा मनात जपतानाच, ध्येयाचा अंगारही फुलविणारी ही शहिदांची पत्रे सर्वांपुढे आलीच पाहिजेत, अशा हेतूने हा संवादही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू या. 

Duration: 00:32:53
`ती` आनंदी तर घर सुखी...
Mar 16, 2024

कुटुंबातील महिला ही खरंतर त्या घराला पुढे घेऊन जात असते. घरात कोणी आजारी पडले तरी त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचे धैर्य तिच्यात पुरुषांच्या तुलनेत खचित अधिकच असते. अशी ही स्त्री आजारी पडली तर घरची अख्खी घडी विस्कळीत होऊन जाते. मग, हे असं का घडतं, याचा वैद्यकशास्त्राच्या  दृष्टिकोनातून मागोवा घेतला आहे पुण्यातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. नेहा कुलकर्णी यांनी, संतोष देशपांडे यांंसमवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्टमधून. आपल्या कुटुंबातील स्त्रीला आनंदी राखलं तर तिचं शारीरिक व मानसिक स्वास्थही आपोआप चांगलं राखलं जातं. त्यासाठी काय करायला हवं, याची छानशी उलगड डॉ. नेहा कुलकर्णी यांनी करुन दाखवली आहे, जी प्रत्येकाने ऐकायलाच हवी. 

Duration: 00:35:43
आकाशाशी जडता नाते.... (विमेन्स डे स्पेशल)
Mar 08, 2024

हा प्रवास आहे एका विलक्षणाचा शोध घेऊ पाहणाऱ्या तरुणीचा, जिनं अगदी वेगळ्या पद्धतीनं आपल्या आवडीचा मार्ग चोखाळला आणि खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतःला झोकून दिलं. या क्षेत्रातील तिनं एस्टोनएरा हे आपलं पहिलं स्टार्टअप् वयाच्या १८ व्या वर्षी सुरु केलं. तिच्या कामाची दखल घेत तिला रॉयल एस्ट्रानॉमिकल सोसायटी ऑफ लंडनने आपली फेलोशिप प्रदान केली. भेटूया श्वेता कुलकर्णीला. खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने जगभरात कार्य करणारी ही पुणेकर तरुणी आज कट्ट्याची मानकरी आहे. तिच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून उलगड होते, ती एका स्वप्नाची आणि त्या स्वप्नातून आपलं असं जग निर्माण करणाऱ्या ऊर्जेची. खुद्द जयंत नारळीकर, रघुनंदन माशेलकर यांसारख्या महान शास्त्रज्ञांनी कौतुकाची थाप दिलेल्या श्वेताचा प्रवास ऐकणं हा सुद्धा एक समृद्ध करणारा अनुभव ठरावा. 

Duration: 00:37:02
नवा सामाजिक `केमिकल लोचा`!
Mar 02, 2024

आज आपण सर्वजण समाज म्हणून एक विलक्षण अस्वस्थता अनुभवत आहोत. एकमेकांविषयी अविश्वास, मनात काही ना काही निमित्ताने सतत निर्माण होत असणारे काहूर, सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात बोलताना घसरलेली भाषा अशी अनेक लक्षणे या नव्या सामाजिक `केमिकल लोचा`ची आहेत. हे असे का होते आहे, त्यापासून दूर होऊन आपण स्थिर होत प्रगतीपथावर कसे राहू शकतो, याचा विचार होणं नितांत आवश्यक आहे. ज्येष्ठ संपादक व चिंतनशील विचारवंत श्री. यमाजी मालकर यांनी  संतोष देशपांडे यांसमवेतच्या गप्पांमधून हा विषय अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला आहे. आपल्याला आरसाही दाखवला आहे आणि यातून सुटकेचा मार्गही दाखवला आहे. प्रत्येकाने जरुर ऐकावा, विचार करावा, इतरांनाही ऐकवावा आणि आपल्या आयुष्यातील प्रगतीचा खरा मार्ग अनुसरावा, असा हा खास पॉडकास्ट. 

Duration: 00:31:16
एका `सचिन`ची जडणघडण!
Feb 24, 2024

नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघातील सचिन धस याने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सचिन ज्या बीड शहरातून येतो, तेथे प्रशिक्षणासाठी कोणतीही अनुकूल स्थिती नसतानाही, त्याचे वडील संजय धस यांनी त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक आव्हानांवर आपल्या परीने मार्ग काढीत, शक्य त्यांचे सहकार्य घेत आपल्या सचिनला त्याचा खेळ उंचावण्यासाठी दिशा दिली, ऊर्जा दिली. आपल्या मुलाचा मित्र बनून त्याच्या आयुष्याला आकार दिला. केवळ उत्तम खेळाडूच नव्हे तर एक चांगला नागरिक म्हणूनही त्याची ओळख व्हावी, असा त्यांचा आग्रह असतो. संजय धस यांनी संतोष देशपांडे यांसमवेत साधलेल्या या संवादातून सचिनची जडणघडण तर उलगडतेच शिवाय मुलगा आणि वडील यांच्यातील नात्यांमधील आगळे पैलूही पुढे येतात...मुलांसाठी झटू पाहणाऱ्या पालकांना नवी दृष्टी देतात. स्टोरीटेल कट्ट्याचा हा खास पॉडकास्ट प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा. 

Duration: 00:47:54
`असा` रंगतोय जागतिक पुस्तक महोत्सव!
Feb 16, 2024

नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर सध्या `वर्ल्ड बुक फेअर` म्हणजेच जागतिक पुस्तक महोत्सव रंगतो आहे. देशातील एक अत्यंत भव्य आणि देखणा पुस्तक महोत्सव म्हणून जगभरात त्याचा लौकीक असतो. त्याची मुख्य धुरा सांभाळणारे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी थेट महोत्सवात भेट घेऊन संवाद साधला, खास स्टोरीटेल कट्ट्यासाठी. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा. 

Duration: 00:15:19
होय..`ड्रिम` वर्क्स!
Feb 10, 2024

उद्योजकतेच्या वाटेवर पुस्तकं, माणसं, अनुभव जे जे काही लाभते, त्यातून आपल्यातील सकारात्मकता आणखी वाढवत नेली की नवी दिशा मिळू शकते. तुमचा सूर तुम्हाला गवसू शकतो. व्यवसायाचा कोणताही पूर्वानुभव नसताना, उद्योजकतेची कास धरत लाभलेल्या संधी, भेटलेली माणसं, सूचलेल्या कल्पना आणि आलेले अनुभव या शिदोरीवर उमेश पवार या तरुणाने रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. मागे वळून पाहताना, आता त्याला काय वाटते, कोणते अनुभव आले, त्यातून काय शिकता आले याची विलक्षण उलगड होते, ती त्याच्या संतोष देशपांडे समवेत रंगलेल्या गप्पांमधून. उद्योगाची कास धरु पाहणाऱ्या, उद्योगात स्थिराऊ इच्छिणाऱ्या आणि आजवर उद्योगात राहूनही काहीच हाती लागले नाही असे वाटणाऱ्या सर्वांनी आवर्जून ऐकावा असा हा कट्ट्यावरील स्पेशल पॉडकास्ट. जरुर ऐका आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. 

Duration: 01:00:13
गोष्ट एका `तारांगणा`ची!
Feb 03, 2024

चित्रपटसृष्टी, कलाकार यांविषयी आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या क्षेत्राला वाहिलेले मासिक, प्रकाशन सुरु करणे आणि ते अव्याहत चालवणे, हे कार्य प्रत्यक्षात किती आव्हानात्मक असते, याची सर्वांनाच कल्पना असते असे नाही. मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचे मराठी मासिक म्हणून वाचकप्रिय असलेल्या `तारांगण`ने नुकतीच आपली १२ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने, `तारांगण`चे संपादक व ज्येष्ठ सिनेपत्रकार मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून तारांगणची आजवरची वाटचाल, त्यातील महत्त्वाचे टप्पे, कलाकार आणि रसिकांना जोडणारे उपक्रम आदींविषयी वेगळी माहिती पुढे येते. स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट श्रोत्यांना एका आगळ्या प्रवासाची ओळख करुन देईल, हे निश्चित. 

Duration: 00:31:39
`रामराज्य` आले हो...
Jan 27, 2024

अयोद्धानगरीत श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देश राममय झाला. याच काळात, स्टोरीटेलवर `रामराज्य कथा` ही येऊन दाखल झाली. रामराज्य म्हणजे नेमके काय, त्या काळात असे काय होते ज्यामुळे त्यास रामराज्य म्हटले जायचे, तेव्हाचे समाजजीवन कसे होते, समाजापुढचे आदर्श काय होते, परस्परांशी व्यवहार कसे होते या व अशा अनेक गोष्टींची विलक्षण उलगड रामराज्य कथा करतात. या `रामराज्य`ची संकल्पना ज्यांच्यामुळे साकारली ते योगेश दशरथ आणि लेखक संजय सोनवणी यांच्यासमवेत संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद, तुम्हाला `रामराज्या`च्या मार्गावर घेऊन जातो. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा. 

स्टोरीटेलवर रामराज्य कथा ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/ramrajya-katha-2806579
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans

Duration: 00:25:29
पालकहो, जागे व्हा!
Jan 20, 2024

देशातील शालेय शिक्षणाची स्थिती मांडणारे सर्वेक्षण एन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) नुकतेच समोर आले. यातील निरीक्षणे गंभीर आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खालावली असल्याचे त्यातून दिसून येते. विशेषतः आपल्या मातृभाषेतील सोपा परिच्छेद आठवीतील अनेक विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. सोपी गणिते सोडविता येत नाहीत, अशा अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. या पार्श्वभूमीवर आपण नेमके कोठे चुकतो आहोत, ही स्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे, शाळा, शिक्षक व पालक यांनी या समस्येवर कसा मार्ग काढायला हवा, विशेषतः पालकवर्गाने आता जागे व्हावे म्हणजे नमके काय करावे याची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आहे, पुण्यातील अभिनव शाळेच्या विद्यार्थीप्रिय अशा माजी मुख्याध्यापिका व प्रयोगशील मार्गदर्शक विद्याताई साताळकर यांना. विद्याताईंनी आजवर राबवलेल्या उपक्रमांतून आणि त्यातून आलेल्या अनुभवांच्या आधारे या विषयाकडे पालकांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे यावर सुस्पष्ट भाष्य केले आहे. प्रत्येक सजग पालकाने ऐकायलाच हवा आणि सजग नसलेल्या पालकाला सजग करायला लावणारा असा हा खास पॉडकास्ट जरुर ऐका आणि जास्तीत जास्त पालक, शिक्षक अन् विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवा...मुलांचे भवितव्य बदलण्यासाठी एवढे तर करावेच लागेल..पालकहो, आता जागे व्हावे लागेल! 

Duration: 00:36:00
ओमी वैद्य `आईच्या गावात मराठीत बोल`तो तेव्हा...
Jan 13, 2024

`3 इडियटस्` चित्रपटामधील `चतुर` या पात्रातून घरोघरी पोहोचलेला अमेरिकास्थित अभिनेता ओमी वैद्य मराठीमध्ये चित्रपट घेऊन येतो, ही बातमीच तशी अतिशय वेगळी. अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या मात्र मराठीशी नाळ कायम ठेऊ पाहणाऱ्या ओमीला मराठीत अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकांतून पुढे यावंसं वाटलं तेव्हा काय घडलं, हा अतिशय आगळा अनुभव ठरला. या चित्रपटाचे कथानक ज्यांच्या शब्दांतून फुलले त्या अमेरिकास्थित लेखिका अमृता हर्डीकर यांनाही यानिमित्ताने आपल्या मायबोलीत प्रेक्षकांपुढे येण्याची संधी नव्याने लाभली. ओमी आणि अमृताने हे शिवधनुष्य कसे पेलले? विशेष म्हणजे, या चित्रपटात `स्टोरीटेल`नेही भूमिका बजावली आहे, ती नेमकी काय आहे...अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टींची उलगड करणारा स्टोरीटेल कट्ट्याचा हा स्पेशल पॉडकास्ट प्रत्येकाने आवर्जून ऐकावा. `आईच्या गावात..मराठीत बोल` या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेला हा संवाद पडद्यावर दिसणाऱ्या कलाकृतीमागच्या दडलेल्या अनेक कथाही नकळत सांगून जातो, असे हे स्टोरीटेलिंग, ऐकायला विसरु नका! 

Duration: 01:01:06
झलक- पेटलेलं मोरपीस 03
Jan 07, 2024

विषय अत्यंत दाहक... स्टोरीटेल वर प्रचंड गाजलेल्या 'पेटलेले मोरपीस' या मालिकेचा तिसरा सिझन तितकाच जबरदस्त हीट झाला. 'त्या' आणि 'तशा' विषय  मुक्तपणे भाष्य करणार्‍या एका 'क्रांतिकारी' कथानकाची ही छोटी झलक! 
शब्द: नितीन थोरात, आवाज: उर्मिला निंबाळकर 

संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी क्लिक करा- 
https://storytel.com/in/en/books/petlela-morpis-se03e01-2531061?appRedirect=true

Duration: 00:51:55
गोष्ट एका `स्पिरिच्युअल कनेक्ट`ची...!
Dec 30, 2023

मुंबईच्या डॉ. मनिषा अन्वेकर या दर महिन्यात स्वतःचं एक पुस्तक लिहितात. आजवर त्यांची ७५ पुस्तकं एकही महिना न चुकता प्रकाशित झालेली आहेत. अध्यात्मिक समूपदेशक म्हणून कार्यरत असताना, त्यांना विविध विषयांवरील पुस्तक लेखनाची प्रेरणा मिळाली आणि ते एक व्रतच बनले. अशा या अनोख्या पुस्तकप्रपंचामागे नेमके काय आहे, त्यांना हे कसे शक्य होते, त्यांचे कार्य नेमके कसे चालते, अध्यात्मिक समूपदेशन म्हणजे नेमके काय या व अशा अनेक बाबींवर त्यांना बोलते केलं आहे, संतोष देशपांडे यांनी. `हॅपी न्यू इअर` असं म्हणत सर्वांना शुभेच्छा देताना अन् घेताना आपल्या वाचन-मनन संस्कृतीलाही समृद्ध करण्याचा सांगावा घेऊन येणारा हा स्पेशल पॉडकास्ट जरुर ऐका. 

Duration: 00:30:08
सेल्फ पब्लिशिंगच्या जगात...
Dec 23, 2023

सेल्फ पब्लिशिंग म्हणजे लेखकाने प्रकाशनसंस्थेशिवाय स्वतःच आपले पुस्तक प्रसिद्ध करणे. हे क्षेत्र आता झपाट्याने विस्तारते आहे. अनेक होतकरु लेखकांना त्यामुळे स्वतःच्या पुस्तकाचे स्वप्न साकारता येऊ लागले आहे. अशा लेखकांना एकमेकांना साहाय्य करीत या क्षेत्रात पुढे वाटचाल करण्याच्या दृष्टीने अॅस्पायरिंग ऑथर्स अलायन्स ऑफ इंडिया (एएएआय) अशी संघटनाही बांधली आहे. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच आपला सहभाग नोंदविला. या पार्श्वभूमीवर, या चळवळीविषयी व एकूणच सेल्फ पल्बिशिंगच्या क्षेत्राची माहिती सर्वसामान्य रसिक तसेच लेखकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संतोष देशपांडे यांनी लेखिका नीलश्री येलुरकर यांच्याशी संवाद साधला. सेल्फ पब्लिशिंग करणाऱ्या लेखकांकडे पाहण्याचा वाचकांचा दृष्टिकोन बदलायला हवा, असा त्यांचा आग्रह का आहे, हे आपणास हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर उमजेल आणि ओळख होईल, या वेगळ्या ट्रेंडची. 

Duration: 00:22:34
ते मंतरलेले ५ तास ! ( गिरनारवरील अद्भूत अनुभव)
Dec 16, 2023

गिरनार येथील उत्तुंग अशा गुरुशिखरावर जाऊन दत्तगुरुंचे दर्शन घेणं ही असंख्य दत्तभक्तांची अत्यंत तीव्र अशी इच्छा असते. मात्र, केवळ मनात येऊन उपयोगाचं नाही, तर तो योग दत्तगुरुच घडवून आणतात, असाच अनेकांचा अनुभव आहे.  गिरनारवरील १० हजार पायऱ्या चढणे एक मोठे आव्हान दत्तगुरुंच्या कृपेतून सहज यशस्वी होते. स्टोरीटेल कट्टाचे संवादक संतोष देशपांडे यांनी नुकताच असा अनुभव घेतला. त्याविषयी, त्यांच्याच शब्दांत ऐका `ते मंतरलेले ५ तास`. गिरनारची ओढ असणाऱ्या सर्वांनीच ऐकावा अन् इतरांनाही ऐकवावा, असा हा वेगळा पॉडकास्ट.

स्टोरीटेल वर श्री दत्तगुरुंचे महात्म्य उपलब्ध आहे. ते ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://storytel.com/in/en/books/datt-mahatmya-kathasar-1312675?appRedirect=true

Duration: 00:23:59
जगात हमखास काय विकतं?
Dec 09, 2023

विक्री ही एक कला आहे, असे मानले जाते. तरीही जगभर अशा कोणत्या बाबी आहेत, ज्यांना कायम मागणी असते. य  बाबतीत कोणत्या पुस्तकात काय सांगितले गेले आहे...एका अतिशय वेगळया विषयी योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांच्यात रंगलेला हा पॉडकास्ट. 

Duration: 00:23:18
`स्टोरीटेल` इंडियाची सहा वर्षे!
Dec 02, 2023

`स्टोरीटेल`ने नुकतीच भारतातील आपली सहा वर्षे पूर्ण केली. या सहा वर्षांचा मागोवा घेता, `स्टोरीटेल`ने भारतीय, विशेषतः मराठी रसिकांना काय दिलं, याचा लेखाजोखा मांडला आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी. श्राव्य पुस्तकांची म्हणजेच ऑडिओबुक्सची सवय आता मराठी वाचकांना लागली आहे, या पार्श्वभूमीवर, आपल्याकडे हे क्षेत्र कितपत रुजले आहे, पॉडकास्टिंगमध्ये `स्टोरीटेल कट्टा` कसा लोकप्रिय ठरला, `स्टोरीटेल`चे विस्तारधोरण बदलले आहे का या व अशा अनेक प्रश्नांची स्पष्ट शब्दांत उत्तरे यातून आपणास मिळतात. जरुर ऐकावा असा हा पॉडकास्ट. 
स्टोरीटेल ने नुकतेच रिलीज केलेल्या सुहास शिरवळकर यांच्या `अस्तित्व` या कादबंरीला ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/astitva-2726435
स्टोरीटेलचे वर्गणीदार होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans
 

Duration: 00:22:44
मिशन गोल्डन कॅटस् ... `सु.शि.` अन् स्टोरीटेल!
Nov 28, 2023

२७ नोव्हेंबर म्हणजे `स्टोरीटेल इंडिया`चा वर्धापनदिन. हा सहावा वर्धापनदिन एका वेगळ्या उपक्रमातून साजरा झाला. तो होता, रसिकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्यांची अमृतजयंती साजरी करताना, एका राज्यस्तरीय कादंबरीलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे विजेते ठरले ते चेन्नईत राहणारे मराठी साहित्यिक रवींद्र भयवाल. त्यांची `मिशन गोल्डन कॅटस्` ही कादंबरी नेमकी काय आहे, ती साकारताना त्यांचे अनुभव काय आहेत, एकूणच ही स्पर्धा आणि तिची आयोजक आणि लेखक या दोन्ही बाजूंची प्रक्रिया कशी होती, या कादंबरीचे कथासूत्र काय या व अशा अनेक बाबींची उलगड करणारा एक उत्स्फूर्त अन् मुक्त संवाद स्टोरीटेल कट्ट्यावर रंगला, तो रवींद्र भयवाल, सम्राट शिरवळकर आणि संतोष देशपांडे यांच्यात. तोच आहे हा स्पेशल स्टोरीटेल कट्टा. रसिकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांची स्मृती जागवतानाच, नवी काही पेरणी करण्याच्या प्रयत्नाचा हा आगळा उपक्रम...त्याविषयी जरुर ऐका. 

`मिशन गोल्डन कॅटस्` ही कादंबरी `स्टोरीटेल` वर ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/mission-golden-cats-2726436
`स्टोरीटेल` चे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans

Duration: 00:26:18
झलक- मनात (संदीप खरेंच्या आवाजात)
Nov 25, 2023

मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अच्युत गोडबोले यांची कादंबरी म्हणजे "मनात". मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे. अशा या `मनात`ची झलक ऐका, संदीप खरे यांच्या आवाजात! 
`मनात` संपूर्ण ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/manaat-1335489
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans

Duration: 01:54:43
`डॉक्टर` बाय प्रोफेशन, `रायटर` बाय पॅशन!
Nov 18, 2023

डॉक्टरकीचं शिक्षण घेत असतानाच त्यानं लिहिलेलं पहिलं इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. त्याचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढचं पुस्तक तर बेस्ट सेलरच्या यादीच झळकलं. देशभरात आता त्याची ओळख एक आघाडीचा इंग्रजी रोमॅंटिक लेखक म्हणून बनली आहे. पुण्यातील आदित्य निघोटची गोष्ट लय भारी आहे. एकीकडे डॉक्टरकी आणि दुसरीकडे लेखनप्रपंच सांभाळत हा तरुण लेखक स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करतो आहे. डॉ. आदित्यचा आजवरचा भन्नाट लेखनप्रवास उलगडणारा स्टोरीटेल कट्ट्यावरील हा विशेष पॉडकास्ट प्रत्येक युवा लेखकाने ऐकायला हवा. 

Duration: 00:19:15
अशी प्रवाहे... अक्षरधारा
Nov 11, 2023

मराठी पुस्तकांना मागणी नाही, ही ओरड खोटी ठरवित या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली ती `अक्षरधारा`ने! ग्रंथयात्रेत काम करताना पुस्तकांच्या प्रेमात पडलेल्या रमेश राठिवडेकर यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी अव्याहत कष्टातून, चिकाटीने आणि कल्पकतेने ही `अक्षरधारा` राज्यभरात प्रदर्शनांच्या माध्यमातून पोहोचविली. व्यवसाय व व्यवहाराच्या पलीकडे जाऊन वाचक, प्रकाशक, लेखक अशा तिन्ही घटकांना एका सूत्रात बांधत त्यांनी आव्हानांचे संधीत कसे रुपांतर केले, याची ही विलक्षण गोष्ट, राठिवडेकरांकडून उलगडवली आहे, संतोष देशपांडे यांनी. पुस्तकप्रेमी प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, असा हा स्टोरीटेल कट्टाचा दिवाळी स्पेशल पॉडकास्ट. 

Duration: 00:30:46
गोष्ट एका सेवाकार्याची!
Nov 04, 2023

समाजातील दुर्लक्षित घटकांचे सक्षमीकरण झाले तरच तो समाज खऱ्या अर्थाने पुढं येऊ शकतो. पुण्यानजिक वेल्हे व भोर तालुक्यांमधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी  तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या संस्थेने विविध सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून मोठं काम उभा केलं आहे. त्याचीच उलगड केली आहे, संस्थेचे सचिव मंदार अत्रे यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या गप्पांमधून. सेवाभावाने केलेल्या कार्यातून इतरांचं आयुष्य तर फुलतच शिवाय स्वतःच्या आयुष्यालाही वेगळा आशय मिळतो, हे अधोरेखित करणारा हा पॉडकास्ट. 

Duration: 00:26:05
वक्तृत्वावर बोलू काही...
Oct 28, 2023

वक्तृत्व ही दैवी देगणी असते, अंगभूत प्रतिभा असते की सहजसाध्य कला असते असा प्रश्न अनेकदा पडतो. त्याची उत्तरे शोधण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, प्रसिद्ध संवादक, वक्ते आणि माध्यमविद्या क्षेत्रातील प्राध्यापक देवदत्त भिंगारकर यांना. वक्तृत्वकला कशी जोपासता येऊ शकते, त्यासाठी काय करायला हवं, उत्तम वक्त्यांमधील वेगळपण काय असते यावर प्रा. भिंगारकर या गप्पांमधून प्रकाश टाकतात. ज्यांना आपण उत्तम बोलू शकतो असं वाटतं पण पुढं आत्मविश्वास डळमळीत होतो, अशा प्रत्येकानं जरुर ऐकायला हवा, असा स्टोरीटेल कट्टा स्पेशल पॉडकास्ट. 

Duration: 00:24:55
मराठी भाषिकांनी इंग्रजी साहित्याकडे कसे वळावे?
Oct 21, 2023

इंग्रजी ही जगाची भाषा. उत्तम मराठी साहित्यरसिक असणाऱ्यांना इंग्रजी साहित्याचाही आस्वाद घेण्याची ईच्छा असते. मात्र, त्यांना हे धाडस वाटते. या पार्श्वभूमीवर, मराठी साहित्यरसिकांनी इंग्रजीकडे कसे वळावे, सुरवात कशी करावी, अडचणी कोणत्या असू शकतात आणि त्यावर मार्ग कसा काढता येतो, मराठी लेखकांना इंग्रजीत लिहिता येऊ शकते का, इंग्रजीतील भारतीय लेखकांचे स्थान कसे आहे या व अशा अनेक बाबींची उलगड प्रसिद्ध इंग्रजी लेखक चेतन जोशी यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्टमध्ये केली आहे. जरुर ऐका आणि आपल्या वाचनविचारांचेही सीमोल्लंघन करा. 

Duration: 00:46:41
`शककर्ते शिवराय`च्या निर्मितीमागची गोष्ट!
Oct 14, 2023

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आज शिवरायांवर अनेक पुस्तके आपल्याकडे उपलब्ध असतानाही शिवकथाकार श्री विजयराव देशमुख यांनी लिहिलेल्या `शककर्ते शिवराय` या शिवचरित्राला मानाचे स्थान आहे. हे शिवचरित्र कसे साकारले गेले, या ग्रंथामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वाचकांना आणि अभ्यासकांना खिळवून ठेवतात, या ग्रंथनिर्मितीमागची पार्श्वभूमी काय होती या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा हा पॉडकास्ट. या पुस्तकाचे प्रकाशक असणाऱ्या छत्रपती सेवा संघाचे एक प्रमुख कार्यकर्ते श्री मोहनराव बरबडे यांच्याशी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या पॉडकास्टमधून `शककर्ते शिवराय`चे वेगळेपण तर अधोरेखित होतेच शिवाय हे शिवचरित्र प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमागची प्रेरणाही उलगडते. जरुर ऐकावा आणि इतरांपर्यंत पोहोचवावा, असा हा पॉडकास्ट. 

Duration: 00:28:09
इस्त्रायल युद्धाच्या `टायमिंग` मागचं गूढ!
Oct 11, 2023

इस्त्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरु आहे. त्याचे भीषण परिणामही आता पुढे येऊ लागले आहेत. सर्व काही सुरळीत चालू असतानाच हे युद्ध का सुरु झाले आहे असाच प्रश्न अनेकांच्या मनात डोकावतो. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील या युद्धामागची नेमकी काय कारणं आहेत यापेक्षा त्याची वेळ हीच का निवडण्यात आली असावी, त्याचा नेमका कोणाला आणि कसा फायदा होऊ शकतो, यातून ग्लोबल ऑर्डर बदलल्याचे संकेत मिळत आहेत का या व अशा बाबींची उलगड करण्याचा प्रयत्न योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी केला आहे, या विशेष पॉडकास्टमधून. 

Duration: 00:20:41
झलक- रहस्य `डीएनए`चं!
Oct 07, 2023

एका बाळाच्या डीएनए सॅम्पलवरुन त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळतं का, याची रहस्यमय कथा म्हणजेच `रहस्य डीएनएचं`. स्टोरीटेलवरील खाकी स्टोरीज् मालिकेतील ही कथा श्रोत्यांना प्रचंड आवडली आहे. निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली आणि अभिनेते शशांक शेंडे यांच्या दमदार आवाजातून साकारलेली ही कथा ऐकणं, हा एक आगळा अनुभव ठरावा.  अशा या कथेची एक झलक आपल्या सर्वांसाठी, स्टोरीटेल कट्ट्यावर. 
ही संपूर्ण कथा स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/dna-che-rahasya-2158364
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans

Duration: 00:10:24
व्यक्तिमत्व घडविणारे खरे पैलू कोणते?
Sep 30, 2023

आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारे खरे घटक कोणते असतात, हा सर्वांच्याच मनात डोकावणारा प्रश्न. अशा कोणत्या बाबी असतात, ज्या व्यक्तीचं महत्त्व वाढवितात, तो नेमका कोणता दृष्टिकोन असतो जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं राखतो या व अशा विविध बाबींची उलगड करणारा स्टोरीटेल कट्ट्यावरील हा अत्यंत वेगळा पॉडकास्ट. ज्येष्ठ पत्रकार, संवादक राजेंद्र हुंजे यांनी आजवर अनुभवलेल्या अनेक थोर व्यक्तिमत्वांमधील वेगळेपण अधोरेखित करताना हा विषय सहज उलगडून दाखविला आहे, संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून. जरुर ऐकावा आणि इतरांनाही आवर्जून ऐकवावा, असा हा स्वतःकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन देणारा संवाद. 

Duration: 00:18:27
ग्रंथालयांचं आता भवितव्य काय? - उज्ज्वल आहे!!
Sep 23, 2023

ग्रंथालय म्हणजेच वाचनालयांनी आपल्या महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनाला पुस्तकांच्या, विचारांच्या जवळ ठेवले आणि त्यामुळेच महाराष्ट्र हा कायमच देशात आपले अग्रस्थान राखू शकले. गेल्या काही वर्षांत आलेल्या स्थित्यंतरांमुळे आता महाराष्ट्र ज्यातून घडला अशा ग्रंथालयांचे, पर्यायाने येथील वाचनसंस्कृतीचे काय होणार अशी शंका सर्वांच्या मनात डोकावू लागली. याच विषयाचा समग्र अभ्यास केलेल्या आणि वाचनचळवळीशी जवळचं नातं असणारे प्रसाद मिरासदार यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आणि त्यातून पुढं आलं एक आगळी शक्यता... महाराष्ट्रातील ग्रंथालयांचं भवितव्य काय असू शकतं! पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं ऐकालयाच हवा, असा हा खास पॉडकास्ट! 

Duration: 00:38:20
मराठी उद्योजकांचा `सक्सेस कोड` काय आहे?
Sep 16, 2023

उद्योजक म्हणजे समाजाला पुढे घेऊन जाणारा धाडसी घटक. अशा उद्योजकांच्या वेगळेपणाला अधोरेखित करीत त्यातून प्रेरणादायी असं काही समाजापुढे आणत राहणं, ही नक्कीच आगळी बाब ठरते. छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक, उद्योजक दत्ता जोशी यांनी आजवर तब्बल हजारोंहून अधिक उद्योजकांशी संवाद साधून त्यांची वाटचाल आपल्या पोलादी माणसं, मुव्हींग एस्पिरेशन्स अशा पुस्तकमालिकांमधून समाजापुढे उलगडून दाखवली आहे. या उद्योजकांच्या यशाचं रहस्य काय, त्यांच्यातील वेगळेपण काय याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला आहे, संतोष देशपांडे यांनी. प्रत्येकाने जरुर ऐकावा, इतरांनाही ऐकवावा असा दत्ता जोशी यांनी या संवादातून उलगडून दाखवलेला उद्योजकांचा सक्सेस कोड, खास स्टोरीटेल कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी! 

Duration: 00:58:21
पॉडकास्टिंगच्या जगात....
Sep 09, 2023

मराठी पॉडकास्टिंगमध्ये स्टोरीटेल कट्टा अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. यानिमित्ताने, एकूणच पॉडकास्टिंगमध्ये सध्या काय सुरु आहे, जगातील चांगले पॉडकास्ट कोणते, मराठीत पॉडकास्टर बनण्यासाठी काय करावं लागतं, या विषयावर गप्पा मारल्या आहेत, स्टोरीटेलचे इंडिया हेड योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी. जरुर ऐकावा असा हा पॉडकास्टिंगवरला पॉ़डकास्ट! 

Duration: 00:25:29
`एआय` आणि `हॉलिवुड`मधील संप
Aug 26, 2023

आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञान आता सर्वत्र झपाट्याने वापरले जाऊ लागले आहे. मात्र, लेखन, कला, अभिनय अशा सर्जनशील क्षेत्रांत `एआय`च्या आगमनाने अनेक प्रश्नही पुढे आणले आहेत. यातून बेरोजगारीपासून स्वामीत्व हक्कांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. सध्या अमेरिकेत, तेथील चित्रपटसृष्टी म्हणजेच, हॉलिवुडमध्ये लेखक, तंत्रज्ञान वगैरे यांच्या संघटनांनी याच मुद्द्यांवरुन संप पुकारलेला आहे. हा प्रश्न कसा सुटेल, त्याचा जगभरात काय परिणाम होईल, `एआय`वर नेमका आक्षेप काय आहे, ऑडिओ इंडस्ट्रीतही याचा प्रभाव पडणार का व अशा अनेक प्रश्नांची इंटरेस्टिंग उलगड स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी केली आहे, संतोष देशपांडे यांसोबतच्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.  

Duration: 00:25:45